नवरात्री 2024

Navratri 2024 Devi Kushmanda: आजची चौथी माळ रंग केशरी, जाणून घ्या कुष्मांडा देवीची कथा...

Published by : Team Lokshahi

शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. देशभरात नवरात्रीचा उत्सव हा मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. सगळीकडे देवीची पूजा, आरती, गरबा अशा जल्लोषात नवरात्रीचा उत्साह आपल्याला पाहायला मिळतो. देवीच्या मंदिरात तसेच घरोघरी घटस्थापना केली गेली आहे. नऊ वेगवेगळ्या रुपात अवतार घेऊन नवदुर्गेने महिषासुराचा वध केला होता. दुर्गेच्या या नऊ अवतारांची गाथा आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे. तर देवीला अनेक नावांनी ओळखले जाते महिषासुरमर्धिनी, दहिषासुरमर्धिनी, करवीरपुरवासिनी तसेच दुर्गा अशा अनेक नावात देवी दुर्गेची व्याप्ती आहे. देवीचे चौथे रुप हे देवी कुष्मांडा हे आहे. जाणून घेऊयात देवी कुष्मांडा कोण होती.

आपल्या स्मित हास्यामुळे संपुर्ण ब्रह्मांडांत देवी कुष्मांडाला ओळखले जाते, तसेच याच स्मित हास्याने ब्रह्मांडांचे उत्पन्न केल्यामुळे या देवीला कुष्मांडा देवी असे म्हटले जाते. कुष्मांडा देवीची प्रतिमा ही अतिशय तेजस्वी आणि अष्टभुजाधारी आहे. कुष्मांडा देवीच्या उपासनेमुळे भक्तांचा आजार बरा होतो. या देवीला आठ भुजा आहेत त्यामुळे या देवीला अष्टभुजा या नावाने देखील ओळखले जाते.

तिच्या सात हातांत कमंडलू, धनुष्य, बाण, कमळाचे फूल, अमृतकलश, चक्र आणि गदा आहे तसेच आठव्या हातात जपमाळा असून तिचे वाहन सिंह आहे. कुष्मांडा देवीची उपासना मनु्‍ष्याला रोगापासून मुक्त करून सुख, समृद्धी आणि प्रगतीकडे घेऊन जाणारी ही देवी आहे अशी मान्यता सांगितली जाते. कुष्मांडा देवीने सुर्य आणि ग्रहांनी आकाशगंगा तयार केली म्हणून या देवीला सृष्टीनिर्माती देखील म्हटले जाते.

देवी कुष्‍मांडा मंत्र:

कुष्‍मांडा देवीचे तीन मंत्र आहेत ज्यामध्ये एक बीज मंत्र आहे तसेच देवीचे पूजा मंत्र आहे आणि ध्यान मंत्र असे तीन मंत्र देवीसाठी जपले जातात.

बीज मंत्र:

कुष्मांडा ऐं ह्री देव्यै नम॥

पूजा मंत्र:

ऊं कुष्माण्डायै नम॥

ध्यान मंत्र:

वन्दे वांछित कामर्थे चन्द्रार्घकृत शेखराम्। सिंहरूढ़ा अष्टभुजा कूष्माण्डा यशस्वनीम्॥

Sambhajiraje Chhatrapati : अरबी समुद्रातील शिवस्मारक शोधायला चला, संभाजीराजे छत्रपती, कार्यकर्त्यांसह गेटवे ऑफ इंडिया येथे धडकणार

Chembur: मुंबईतील चेंबूर (पूर्व) येथील सिद्धार्थ कॉलनीमध्ये अग्नितांडव

मासिक पाळीत चेहऱ्यावरचे डाग घालवण्यासाठी करा 'हे' घरगुती उपाय; जाणून घ्या...

जम्मू व काश्मीर, हरियाणात 'इंडिया'? मतदानोत्तर चाचण्यांचा अंदाज

Mumbai Heat: मुंबईत उकाडा वाढण्याचा अंदाज; तापमान 33 ते 36 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता